अभिजीत कदम यांची भारतीय नार्थ झोन संघात निवड*

Admin
By -



       सांगलीचे सीनियर क्रिकेट खेळाडू व वेटरंस क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू प्राध्यापक अभिजीत कदम सीनियर आय पी एल नंतर यांची निवड भारतीय नॉर्थ झोन या संघामध्ये निवड झाली आहे.
    जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय व सीनियर आईपीएल स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर निवड झालेली आहे. सदर स्पर्धेतून श्रीलंका येथे होणाऱ्या सीनियर वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा होणार आहेत या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका ,वेस्टइंडीज व इतर देशांचे संघ सहभागी होणार आहेत या वर्ल्ड कप करिता साउथ, ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ असे भारताचे चार संघ तयार करण्यात आले आहेत यापैकी अभिजीत कदम यांची नॉर्थ झोन संघात निवड झाली आहे या चार  संघाच्या स्पर्धा दिल्ली येथे दिनांक 20 ऑक्टोंबर पासून होणार आहेत या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड वर्ल्डकप च्या सीनियर भारतीय संघात होणार आहे या स्पर्धेत जर अभिजीत कदम यांची उत्कृष्ट कामगिरी झाली तर ते सीनियर भारतीय संघात निवडले जातील आणि सांगली जिल्ह्यातील ते पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सीनियर खेळाडू ठरतील यापूर्वी त्यांची सलग तीन वर्ष सीनियर राज्य संघात व सीनियर आयपीएल संघात निवड झाली होती ते सांगली जिल्हा वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत त्यांना माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम ,आमदार विक्रम सावंत ,डॉक्टर जितेश कदम ,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मा.संजय बजाज ,ज्येष्ठ नेते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष पै नामदेवराव मोहिते तसेच वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदय शिंदे ,उपाध्यक्ष सागर बिरजे ,सचिन जगदाळे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे. त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.