राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे
याबाबतची अधिक माहिती अशी की बाबा सिद्दिकी आणि त्यांचे पुत्र आ. झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व येथील परिसरातील खेरनगर येथील कार्यालयाजवळ थांबलअसता त्यावेळी त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात तेगंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी. यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
राज्याचं मंत्रिपद भूषवलेल्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राज्यभर खळबळ उडाली असून कायदा- सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.