5वी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस रँकिंग टूर्नामेंट मध्ये 19 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये अनन्या चांदे मुंबई उपनगर तर मुलांच्या गटामध्ये. ध्रुव शहा मुंबई उपनगर प्रथम
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन मार्फत पाचवी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस रँकिंग टूर्नामेंट चे आयोजन दिनांक 10 ते 14 2024 या कालावधीमध्ये नव कृष्णा व्हॅली बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आलेले आहे स्पर्धेच्या आजचा तिसरा दिवस त्यामध्ये 19 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा अभिजीत कदम सचिव वेटरन्स क्रिकेट असोसिएशन सांगली व विनायक जोशी यांच्या प्रमुख सुरज स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना बक्षीस देण्यात आली स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 19 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये अनन्या चांदे उपनगर मुंबई प्रथम श्रावणी लोके मुंबई उपनगर द्वितीय ऋतुजा चिंचणसुरे ठाणे तृतीया रितिका मधुर ठाणे चतुर्थ
तर मुलांच्या 19 वर्षाखालील गटामध्ये ध्रुव शहा मुंबई उपनगर प्रथम पार्थ मगर मुंबई शहर द्वितीय सिद्धांत देशपांडे मुंबई शहर तृतीय निल मुळे पुणे चतुर्थ
सदर महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे चेअरमन मा.प्रवीणजी लुंकड ,एन जी कामत सचिव ,संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन यांनी स्पर्धा पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणे योगदान आहे यावेळी नव कृष्णा व्हॅली स्कूल मुख्याध्यापक अधिकराव पवार ,विनायक जोशी ,राजेंद्र पाचोरे, श्रीशैल मोटगी ,प्रशांत चव्हाण ,रघुनाथ सातपुते, प्रदीप पाटील तसेच महाराष्ट्र राज्य टेबल टेनिसचे मुख्य पंच म्हणून मधुकर लोणारे व सतीश पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.