वाहतूक नियमांची ऐशी की तैशी

Admin
By -





सिव्हिल हॉस्पिटल चौक हा नेहमीच रहदारीचा चव आहे अनेक शाळा कॉलेज आणि नागरी वस्ती तसेच हॉस्पिटल या परिसरामध्ये खूप असल्याने येथे नेहमीच नागरिकांची गाड्यांची वर्दळ ही नेहमीच दिसत असते त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी ह वारंवार होताना दिसूनच येते
काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल चौकामध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले या चौकामध्ये वाहतूक पोलीस असतो तो फक्त नावाला कोणत्यातरी एका कोपऱ्यात उभारलेला वाहतूक पोलीस दिसत असतो,
अर्धा तास पेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाल्याने चारीही बाजूने वाहनांची मोठी गर्दी झालेली होती. यामध्ये रुग्णवाहिका हे अडकलेल्या चे चित्र समोर आलेले आहे या वाहतूक कोंडीवर तातडीने काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे .
       एका बाजूला वाहतूक पोलिसाची गरज आहे असे जर आपण म्हणत असो तर तितकेच काळजी वाहनधारकाने ही घेणे गरजेचे आहे जर वांधारकांनी थोडी शिस्त पाळली तर अशी वाहतूक कोंडी सिविल हॉस्पिटल चौक नव्हे तर कोणत्या चौकात होणार नाही.