*महत्वाची सूचना*
*कोयना धरण*
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १२:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुट उघडून *९,५४६ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.*
धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून *नदीपात्रात एकूण ११,६४६ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येईल.*
*कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.*