नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम *गोपाळकाला दहीहंडी* कार्यक्रमाचे आयोजन

Admin
By -


          सुरज फाउंडेशन संचालित 
 
     
       नव कृष्णा व्हॅली  स्कूल मराठी माध्यम गुरुवार दिनांक 29 8 2024रोजी इयत्ता नर्सरी ते दहावी  वर्गांचे  *गोपाळकाला दहीहंडी* कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय अधिकराव पवार सर यांच्या शुभहस्ते दहीहंडी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर प्रशालेतील इ. 2 रीच्या विद्यार्थिनीनी *कृष्ण मुरारी* या गीतावरती कुमारी वीरा तन्वी,सई,ब्राह्मी, अलिझा,आरोही,सिद्धी,तर *गोविंदा रे गोपाला ***या गीतावरती नृत्यविष्कार  इयत्ता 3री 4थी रुद्र, तन्वी,माही,ओंकार,विराज,,अद्या, ओजस,आरोही,प्रणाली,स्वस्तिका, आराध्या, रेयांश,तथास्तु , ब्राह्मी, श्रीतेज, श्रेयश यानी नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. त्यामध्ये नर्सरी ते मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10 वी असे विद्यार्थ्यांचे गट करून प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या *डोळ्यावरती पट्टी बांधून दिशादर्शक म्हणून  ढोल ताशाच्या  तालावर ***विद्यार्थी व विद्यार्थिनींना दहीहंडी फोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले  *अभ्यास गटातून   सुमेध म्हेत्रे, इयत्ता 3 री आरुष सत्याचारी*  5वी ते 10 वी मधून मानवी मनोरा करून दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. यावेळी गोपाळकाला विषयी माहिती सहाय्यक शिक्षिका सौ सलमा मुजावर मॅडम सांगितली. अभ्यास गटाच्या सहाय्यक शिक्षिका योगिता विसापूरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दहीहंडी सजावट व सर्व व्यवस्था क्रीडाशिक्षक श्री राहुल माने व कला शिक्षिका कुमारी दिपाली डुबल यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था सौ प्रतिभा रजपूत मॅडम,शुभांगी ढेरे मॅडम यांनी केली हा कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी ज्यांची नेहमीच साथ असते ते प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेचा केंद्रबिंदू असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय जल्लोषित वातावरणामध्ये कार्यक्रमाची सांगता झाली.