सी बी एस इ दिल्ली बोर्ड क्लस्टर 9 च्या बॅडमिंटन स्पर्धेत नव कृष्णा व्हॅली स्कूलचे घवघवीत यश

Admin
By -



रिदिमा मराठे व अन्वी कुलकर्णी यांनी रौप्य पदक प्राप्त केले 



                   सीबीएसई दिल्ली बोर्ड अंतर्गत क्लस्टर 9 च्या बॅडमिंटन स्पर्धा भिवंडी येथे 19 ते 22 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत महाराष्ट्र ,गोवा येथील 40 स्कूल मधील 2500 खेळाडू सहभागी झाले होते सदर मुलींच्या 17 वर्षाखालील गटात रिदिमा मराठे व अन्वी कुलकर्णी यांनी सर्व खेळाडूंना नमवून रौप्य पदक प्राप्त केले या वर्षी सुद्धा शालेय 17 वर्षाखाली जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे तसेच मागील वर्षी त्यांनी शालेय बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत प्राविण्य यश संपादन केले होते. दोघी खेळाडू दररोज सकाळी व सायंकाळी या वेळेत बॅडमिंटन या खेळात करिअर करण्याच्या उद्देशाने कसून सराव श्री धीरज कुमार यांच्याकडे धडे घेत आहेत. तसेच दोघी नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये शिक्षण ही घेत आहेत त्यांना प्रवीण लुंकड अध्यक्ष , एन जी कामत सचिव , संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन, तसेच डॉक्टर यशवंत तोरो चेअरमन स्कूल कमिटी ,प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल,. विनायक जोशी स्पोर्ट्स सिंचन सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.