लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Admin
By -






      तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमीनीचे ७/१२ उता-यावरील खरेदी देणार यांचे नाव कमी करुन तक्रारदार यांचे नावाची नोंद होवुन, नोंद मंजूर करून उतारा देणेकामी लोकसेवीका सिमा विलास मंडले, यय ४४ वर्ष, व्यवसाय तलाठी येडेमच्छिंद्र, २) चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी, उमेदवार, खाजगी इसम, तलाठी कार्यालय येडेमच्छिंद्र यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा नक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.०१.०८.२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्यूरो सांगली पथकास दिला होता.

    तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.०२.०८.२०२४ रोजी व्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये यातील आरोपी लोकसेविका नं.१ श्रीमती सिमा मंडले, तलाठी येडेर्माचंछद्र व आरोपी नं.२ चंद्रकांत सुर्यवंशी, खाजगी इसम यांनी आपले स्वतःचे पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट व गैरमार्गान तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद सर्कल श्रीमती जाधव यांना सांगून मंजूर करुन घेण्यासाठी, आरोपी नं.२ चंद्रकांत सुर्यवंशी, खाजगी इसम यांने मंडल अधिकारी श्रीमती जाधव यांचेशी व्हॉट्सअप कॉलवर चर्चा करुन तक्रारदार यांचेकडे सर्कल जाधव व प्रांताधिकारी यांचेकरीता एकुण ७०००/- रुपये लाचेची मागणी केली, त्यावेळी आरोपी नं.१ श्रीमती सिमा बिलास मंडले, तलाठी यांनी चर्चमध्ये सहभाग घेवुन तक्रारदार यांनी लाच रक्कम चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी यांना द्यावी याकरीता तक्रारदार यांना प्रोत्साहन दिलेचे निष्पन्न झाले.

         त्या अनुषंगाने लोकसेवीका सिमा विलास मंडले, २) चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी, यांच्नेविरुध्द डस्न्नामपुर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

       सदरची कारवाई मा. श्री. शिरीष सरदेशपांडे सो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्री. विजय चोधरी सो, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव, चालक विठ्ठल रजपुत यांनी केली आहे.