कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., सांगली यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई यांचा पुणे विभागातून १००० कोटी वरील ठेव गटातून प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२४ देवून गौरविणेत आले. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३ व ४ ऑगष्ट रोजी हैद्राबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
हा पुरस्कार कॉसमॉस को ऑप. बँकेचे चेअरमन श्री. मिलिंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे, गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळयास संपुर्ण महाराष्ट्रातून पतसंस्था क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पुरस्कार देताना संस्थेचे अर्थकारण संस्थेच्या वापरातील तंत्रज्ञान, समाजकारण, संस्थेने ग्राहकांना दिलेल्या आधुनिक सेवा, संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहकसेवा व समाजसेवा, व्यवस्थापन, सहकारातील योगदान या मापदंडावर आधारीत संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावाची स्वतंत्र निवड समितीने छाननी केल्यानंतर या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली होती. संस्थेने महाराष्ट्रातील सहकार चळवळीत आदर्श काम करुन इतर संस्थांच्या पुढे आदर्श निर्माण केल्याचेही पुरस्कार वितरण सोहळयात नमुद करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिली.
संस्थेच्या ठेवी रु.११२० कोटी असून रु.८२३ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणुक रु. ४०१ कोटी आहे. संस्थेचे भागभांडवल रु. ३७ कोटी असून सभासद संख्या ६५२०० आहे. मार्च २०२४ अखेर संस्थेस २६ कोटी १ लाखाचा नफा झाला आहे.
या पुरस्काराचे श्रेय त्यांनी संस्थेचे संचालक मंडळ यांनी केलेले नियोजन, त्यास सभासद, ठेवीदार कर्जदार, सेवक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांची लाभलेली उत्तम साथ याला असल्याचे सांगुन हा पुरस्कार सर्वांच्या सांघिक कार्यास मिळाल्याचे मनोगतात नमुद करुन चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील या सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे संचालक अॅड. एस.पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू ओ. के. चौगुले (नाना), वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे श्री लालासो भाऊसाो थोटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.