प्राणघातक हल्ल्यात तरुणीला वाचवलेल्या अमित मुळकेचा पृथ्वीराज पाटील यांनी केला सत्कार...

Admin
By -





         तीन दिवसापूर्वी सांगलीत काॅलेजला जाताना भर रस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने सपासप वार करुन जीव घेणा हल्ला होताना अनेक लोक काॅलेज काॅर्नरवर बघत राहिले पण मदतीला कोणच पुढे येत नव्हता. अशावेळी अत्यंत धाडसाने रिक्षाचालक अमित मुळके हा धाडसाने त्या तरुणीला त्याच्या रिक्षात घालून सिव्हिल हाॅस्पिटलला दाखल केले व वेळीच उपचार झाल्याने तिचा जीव वाचला. नव्या पिढीने हा अमितचा आदर्श घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले. आज यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात अमित मुळके यांचा या धाडसी कृत्याची नोंद घेऊन त्याचा शाल, बुके व रोख पाच हजाराचे बक्षीस देऊन त्याची पाठ थोपटली. या घटनेदरम्यान डीवाएसपी आण्णासाहेब जाधव यांनी दक्षता घेऊन योग्य पावले उचलून तरुणीला व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊन चांगले काम केल्याचे सांगून पृथ्वीराज म्हणाले, समाजात ज्या ज्या वेळी समाजविघातक गोष्टी घडतात आणि विशेष करुन महिलांवर ज्या वेळी संकट येते त्यावेळी तिच्या मदतीला जाणे हे आपले कर्तव्यच आहे. केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही.

कॉलेज कॉर्नर येथे प्राणघातक हल्ला केलेल्या मुलीला रिक्षामधून स्वतः अमित मुळके याने सिविल हॉस्पिटल येथे घेऊन गेले,त्याचा शाल,बुके व रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन यशोधन सेवा व संपर्क कार्यालय येथे सत्कार केला. यावेळी स्वराज रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ पाटील,अजित पाटील,साजिद अत्तार,रमेश सावंत,कृष्णा जाधव उपस्थित होते