जाडरबोबलाद -मारोळी रखडलेल्या रस्त्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबर रोजी वास्तुशांती सोहळा: ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

Admin
By -
       





        
       गेली अनेक वर्ष जाडरबोबलाद -मारोळी रस्त्याची अवस्था पानंद रस्त्यासारखी झाली होती.९ ऑगस्ट २३ आंदोलनानंतर काम सुरू करण्यात आले होते. परंतु हेही काम रखडले आहे

         बाबाच्या सत्यनारायण महापूजेची जत तालुक्यात चर्चा .
      अध्यात्मिक क्षेत्राबरोबरच आंदोलनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे तुकाराम बाबा यांनी नेहमीच शेतकरी पाणी प्रश्न यावर अनोखे आंदोलन केले आहेत . रखडलेल्या रस्त्यांचे काम पाठपुराव्यानंतर सुरू झाले परंतु सध्या हे काम रखडल्याने नागरिक व भाविकांना नाहक त्रास होत असल्याने या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात होत आहे . या आंदोलनाची अर्थात सत्यनारायण महापूजा ची पत्रिका ही तालुकाभर व्हायरल होत आहे.



          जाडरबोबलाद -मारोळी रस्त्याची अवस्था पानंदरस्त्यासारखी झाली होती म्हणून गतवर्षी ९ ऑगस्ट २०२३ रोजी सोन्याळ फाटा येथे राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन या महिन्यात रस्त्याच्या कामासाठी अर्धवट खडीचे ढीग मारले आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा सोहळा रस्त्याच्या मध्यभागी करणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, मानव मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी याबाबत प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदन दिले आहे. 
         यावेळी शाहीर रामदास भोसले गोंधळेवाडी मानव मित्र बाबा आश्रम संख येथील समर्थ राठोड , गोंधळेवाडीचे ऋषी दोरकर,अमोल भोसले ,महेश कोडग आदी उपस्थित होते .
                        तुकाराम बाबा महाराज म्हणाले,जाडरबोबलाद -मारोळी या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याच रस्त्यावरून तपोवन चिखलगी भुयार मठ, व्हस्पेठ येथील दावल मालिक, हुन्नूर येथील श्री बिरोबा देवस्थान, हुलजंती येथील महालिंगराया, सिद्धनकेरी देवस्थान, माचनुर येथील देवस्थान, गुड्डापूर दानम्मा देवी , मुचंडी दर्याबा या सर्व तीर्थक्षेत्रना ये.जा करण्याकरता महत्त्वाचा भक्तांना  मार्ग आहे. गेली अनेक वर्ष या रस्त्याचे काम रखडले होते या रस्त्याची पानंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती. मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे वाढलेली होती यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते प्रवासांच्या आग्रहास्तव गतवर्षी ९ ऑगस्ट२०२३ रोजी क्रांतीदिनी सोन्याळ फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर आंदोलन मागे घेतले होते यानंतर ऑगस्ट२०२४ च्या सुरुवातीस काम सुरू केले होते परंतु सद्यस्थितीत या ठिकाणी रस्त्यांच्या ठिकाणी दगडाचे डेपो मारलेले दिसून येत आहेत यामुळे रस्ता अजून अरुंद झाला आहे .परिणामी मोठमोठे अपघात होत आहेत या कारणास्तव या रस्त्याच्या मध्यभागी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे..