एन्क्रीश वेब टेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली व इंटेकरेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून विज्ञान प्रदर्शन याचे आयोजन

Admin
By -




एन्क्रीश वेब टेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली व इंटेकरेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड पुरस्कृत कृतीतून विज्ञान हे प्रदर्शन व सायन्स शो याचे आयोजन

  दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी पुष्प आनंद हॉल कच्छी जैन भवन राम मंदिर सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.

प्रदर्शनाची वेळ सकाळी 9.30 पासून रात्री 8 वाजेपर्यंत आहे या प्रदर्शनाला सर्वासाठी मोफत प्रवेश असून दिनांक 11 रोजी सर्व मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त यांच्यासाठी चर्चासत्र आयोजिले आहे.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञानाशी निगडित असलेले 120 विविध प्रयोग व सायन्स ऍक्टिव्हिटी किट्स ठेवण्यात येणार आहेत ज्याच्यातून विज्ञान शिकणे अतिशय सोपे होणार आहे त्याचबरोबर वि‌द्यार्थ्यांसाठी सायन्स शो देखील दाखवण्यात येणार आहे ज्याच्यामधूनआपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान विद्यार्थ्याच्या लक्षात येईल.

तरी सांगली मिरज कुपवाड व शेजारील सर्व ग्रामीण भागातील शाळांनी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नव कृष्णा व्हॅली स्कूलचे विश्वस्त श्री प्रवीणजी लुंकड, संस्थेचे सचिव श्री एन जी कामत आणि संचालिका सौ संगीता पागनीस यांनी केले आहे.