सांगलीमध्ये एकावर खुनी हल्ला

Admin
By -


सांगली पुन्हा एकदा हादरली


सांगली मधील धक्कादायक घटना

सांगली मधील गुंड म्हमद्या नदाफचा साथीदार आणि सध्या'मोका' तील संशयित असणारा मोहसीन आलम पठाण (वय ३२, रा. कत्तलखाना रस्ता, गणेशनगर) याने एका कुटुंबातील सदस्यांना धमकावून शिवीगाळ केल्याने त्याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला.

हि घटना शुक्रवारी रात्री शामरावनगर येथे घडली असुन या हल्ल्यात मोहसीन गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सलमान रियाज मुजावर, सलमानची आई, इरफान मुजावर, आयान मुजावर, हाजीलाल मुजावर, इरफानचे वडिल रियाज (सर्व रा. शामरावनगर, सांगली) यांच्याविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी मोहसीनने घरी येऊन शिवीगाळ करत जाब विचारला. घरात सलमान, सलमानची आई, भाऊ आयान मुजावर, चुलत भाऊ इरफान मुजावर, हाजीलाल मुजावर, इरफानचे वडिल रियाज होते. संशयितांनी त्याला घराबाहेर नेले तेथे त्यांच्या मध्ये वादविवाद झाली. तेव्हा संशयितांनी चाकू, एडक्याने मोहसीनच्या डोक्यात वार केला. वर्मी घाव बसल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेतच तो पळत सिव्हील हॉस्पिटल परिसरात धावत गेला.

सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अकराच्या सुमारास एका इमारतीत लपून बसलेल्या मोहसीनला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्या डोक्यात, गालावर वार झाले आहेत. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यावेळी सिव्हील परिसरात मध्यरात्रीनंतर गर्दी जमली होती. पोलिसांनी जखमी मोहसीनचा जबाब घेऊन सहाजणांविरूद्ध बीएनएस १०९ आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.


मोहसीनवरही खुनी हल्ल्याचा गुन्हा

खुनी हल्ल्यातील जखमी मोहसीन याच्याविरूद्धही खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान रियाज मुजावर याने याबाबत फिर्याद दिली आहे. रात्री साडे आठच्या सुमारास मोहसीन घरी आला होता. त्याने फोन का उचलत नाही, माझ्याबरोबर बोलत का नाहीस, तुला जीवंत ठेवत नाही असे म्हणत कोयत्याने भुवईवर, डोक्यात, हातावर वार केला असे फिर्यादीत म्हटले आहे.