स्टंटबाजी करुन नदीच्या काठावर सेल्फी घेणाऱ्यावर गुन्हे नोंद

Admin
By -




गुन्हयाची थोडक्यात हकीकत -

     धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सततच्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीच्या काठी नागरिक गर्दी करीत असुन काही अतिउत्साही तरुण मुले व नागरिक पुराच्या पाण्यात पुलावरुन उड्या मारणे, स्टंटबाजी करुन सेल्फी काढणे यासारखे प्रकार करीत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन मा. जिल्हादंडाधिकारी सांगली यांनी दिनांक मध्ये 6२६.०७.२०२४ रोजीपासुन ते दिनांक ०६.०८.२०२४ रोजीपर्यंत नदीकाठावरील पुल, बंधारा, घाट, मंदिर, दर्गा याठिकाणी नागरिकांनी जावू नये म्हणुन मनाई आदेश काढलेला आहे. सदर मनाई आदेशाचा जे कोणी नागरिक भंग करतील त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी दिलेले आहे.

     दिनांक २६.०७.२०२४ रोजी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरील नमुद पोलीस स्टाफ सांगली शहरातील कृष्णा नदी काठावरील सरकारीप्नभ घाटावर पेट्रोलींग करीत असताना इसम नामे
१) मौला मेहबुब नदाफ वय-२९ वर्षे, राहणार बायपास रोड, शिवशंभु चौक, सांगली
२) बजरंग तुकाराम कुकडे वय-३४ वर्षे राहणार जामवाडी सांगली,
३) मंथन दिपक मोटे वय २१ वर्षे राहणार रामरहीम कॉलनी, संजयनगर सांगली,
४) अर्जुन रामचंद्र पडळकर वय-१९ वर्षे राहणार-लक्ष्मीनगर, सांगली.
        हे मा. जिल्हादंडाधिकारी सांगली यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करुन स्टंटबाजी करुन नदीच्या काठावर सेल्फी घेत असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरुध्द पोलीस कॉन्टेबल गणेश कांबळे व योगेश सटाले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरीलप्रमाणे ०२ गुन्हे नोंद करणेत आले आहेत.

        सांगली शहर पोलीस ठाणेकडुन शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की, सध्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने मा. जिल्हादंडाधिकारी सांगली यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करुन कृष्णा नदीकाठी, पुलावर, घाटावर येवुन स्टंटबाजी करु नये अन्यथा त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करणेत येईल.