जुना बुधगाव रोड पंचशीलनगर रेल्वे गेट संदर्थात

Admin
By -



आज जुना बुधगाव रोड पंचशीलनगर रेल्वे गेट संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतरावजी पाटील साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत जुना बुधगाव रोड पंचशीलनगर रेल्वे गेटबाबत समस्या मांडल्या.

चिंतामणनगरचा पूल पूर्ण कार्यक्षमतेने सुरु झाल्याशिवाय पंचशीलनगरचा पूल बांधण्यास घेऊ नये अशी सर्वांचीच मागणी आहे त्याचा विचार करताना दिसला नाही

वाहतूक कोंडी मुळे रेल्वे गेटच्या दुतर्फा एकेक किलोमीटर रांगा लागतात.त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.
रेल्वे गेटवर वाहतूक कोंडीमुळे मुलांना वेळेत शाळेत पोहचता येत नाही.

पावसाळ्याचे दिवस असल्याने कृष्णा नदीला पूर आल्यास रेल्वे गेट दरम्यान राहणारे शिंदे माळा , संभाजीनगर तसेच वाल्मिकी परिसर इत्यादी भागातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यास कोणताच पर्यायी मार्ग नाही.

त्यामुळे प्रशासनाने पंचशीलनगरचा पूल करताना या सर्व बाबींचा विचार करावा अशी मागणी आज करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की दैनंदिन माहिती घेतली जाईल, तसेच या ठिकाणी वाहतुक पोलीस कायम तैनात करण्यात येतील , स्थानिक नागरिक व प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

मी वैयक्तिक या कामात लक्ष्य घालीन व पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षणचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,निलेश शाह आदी पदाधिकारी आदी उपस्थित होते.