पण वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल" - पै. चंद्रहार पाटील

Admin
By -


सांगली लोकसभेच्या मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा की ठाकरे गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार यावरून खूप घडामोडी घडल्या महाविकास आघाडी कडून पै चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली.काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून तर चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. या सर्व घडामोडीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बाजी मारत सांगलीच्या जागेवर विजय मिळवला तर ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना 60 हजार 860 इतक्या मतांवर समाधान मानावं लागलंय. यावर चंद्रहार पाटील यांनी पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केलीय.

चंद्रहार पाटील म्हणाले की, "या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू मिळाले, तर कुणाला दिलदार मित्र मिळाले, पण माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र, एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले. पण वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल"