हवामान विभागाने 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र यावेळी तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचला . आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग परिसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असूनया भागात यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रात पाऊस दाखल, मुसळधार पावसाची शक्यता
By -
June 07, 2024