आज ना केंद्रात सत्ता आहे ना राज्यात सत्ता आहे, इतकेच काय साधी कोणत्या महानगरपालिकेत देखील राष्ट्रवादीची सत्ता नाही, मात्र असे असताना देखील आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आज दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादीवर कायम असा आरोप होत असायचा की ‘हा पक्ष सरदारांचा पक्ष आहे. निवडून येणारे लोक एकत्र येतात आणि हा पक्ष बनतो.’ या निवडणूक हा आरोप धुवून निघाला. हा निवडून येणाऱ्या लोकांचा पक्ष नसून शरद पवारसाहेब ज्यांना निवडून आणायचे ठरवतात त्या सर्वांचा हा पक्ष आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरद चंद्र पवार पक्षाच्या या लढाईचे नेतृत्व पवार साहेब तर सेनापती जयंतराव पाटील होते.
पवारसाहेब राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत होते तर जयंतराव पाटील पाटील ऑन फिल्ड संपूर्ण पक्षाची यंत्रणा सांभाळत होते. प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील पदाधिकाऱ्यांशी बोलून उमेदवार निवडणे, नाराजांची नाराजी दूर करणे, दूर गेलेल्या व्यक्तींना जवळ घेणे, प्रसंगी विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला देखील समजावून आपल्या बाजूने काम करायला लावणे, प्रत्येक मतदारसंघात मायक्रो मॅनेजमेंट करणे, उमेदवारांना रसद पुरवणे अशा सर्व गोष्टी जयंतराव पाटील यांनी केल्या. म्हणूनच की काय अमोल कोल्हे यांनी निवडून आल्यावर स्वतःच्या विजयाचे श्रेय जयंत पाटील यांच्या सूक्ष्म नियोजनाला दिले.
विशेष बाब म्हणजे दिवसभर मतदारसंघात नीट नियोजन करता यावे म्हणून ते रात्री प्रवास करत असत, रात्री दोन तीन वाजता उमेदवारांना फ़ोन करुन ठिकठिकाणच्या प्लस मायनस गोष्टी सांगून दुरुस्त्या सुचवत असत.
बीड, माढा इथे अचूक उमेदवारीदिली गेल्याने बराच फरक पडला.
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले…
- ॲड. भूषण राऊत