कुरेश कॉन्फरन्स " च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटीक .*

Admin
By -
   






"कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली " या मुस्लीम खाटीक समाजाच्या देशव्यापी सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी* आटपाडीचे सादिक पापामियाँ खाटीक यांच्या नियुक्तीचे पत्र कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वोच्य न्यायालयात वकीली करणारे ॲडव्होकेट सनोबर अली कुरेशी यांनी पाठविले आहे . या नियुक्तीबद्दल सादिक खाटीक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
                २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तुमची ( सादिक खाटीक ) नियुक्ती करताना मला अत्यानंद होत आहे . केंद्रीय समितीच्या ठरावानुसार संस्थेच्या केंद्रीय कार्य समितीद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे . आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की संस्थेची सर्वांगीण प्रगती पूर्ण देशभर होईल असे कार्य आपले हातून घडावे .  कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने तुम्ही सर्वार्थाने यशस्वी व्हावे , तुमच्या विधायक, उज्ज्वल भवितव्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो . असेही कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी या पत्रात म्हटले आहे .
                भारतातील मांसाहार करणारे सर्व बांधव, पशुपालन करणारे शेतकरी, पशुपालक आणि या व्यवसायात सक्रिय असणारे मुस्लीम खाटीक बांधवांसह इतर धर्मीय खाटीक बांधव या सर्वांच्या सर्व व्यवस्थेशी निगडीत सर्व वैध प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रामुख्याने भर देणार असल्याचे नुतन राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले.
                पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १९९९ च्या स्थापने पासूनचे सक्रीय कार्यकर्ता असणारे सादिक खाटीक यांनी शालेय जीवनापासून लोकनेते राजारामबापू पाटील, त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून आज अखेर म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे मोठ्या निष्ठेने काम केले आहे .
                राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव अशी पदे त्यांनी यापूर्वी भूषविली असून सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आणि ओबीसीतील अल्पसंख्याक विभागाचे पुणे विभागीय अध्यक्ष या पदांवर कार्यरत आहेत .
                राज्यभर गाजलेल्या पत्रकारीतेच्या क्षेत्राबरोबरच समाजातल्या सर्वच क्षेत्रात चौफेर, सर्वांगीण आणि लक्षवेधी काम करणाऱ्या सादिक खाटीक यांनी, अनेक राज्यस्तरीय दैनिकांमधून ३६ वर्षे लक्षवेधी पत्रकारीता केली आहे. मुंबईचा पत्रपंडीत पां. वां. गाडगीळ पत्रकारीता पुरस्कार , बेळगांवचा ग. गो. राजाध्यक्ष पत्रकारीता पुरस्कार , सांगलीचा प्रेरणा पत्रकारीता पुरस्कार , ऑल जर्नालीस्ट अँड फ्रेंड सर्कल महाराष्ट्रचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारीता पुरस्कार आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माणपत्राने सादिक खाटीक यापूर्वी सन्मानीत झाले आहेत . आकाशवाणी सांगली वरून त्यांनी अनेक वेळा तालुका विकासपत्रे सादर केली आहेत . थोर इतिहास संशोधक, साहित्यिक रा. चिं. ढेरे यांच्या *शिखर शिंगणापूरचा शंभु महादेव* या ऐतिहासीक संदर्भ ग्रंथात त्यांच्या लिखाणाचा अनेक वेळा उल्लेख केला गेला आहे.
                ज्येष्ट साहित्यीक डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षानिमित्तच्या सांगता सोहळ्यात माजी केंद्रिय मंत्री, माजी राज्यपाल श्री. राम नाईक यांच्या हस्ते, एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेल मुंबईचे संपादक राजीव खांडेकर, माजी केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटील, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, जि. प. चे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत, लक्षवेधी कार्याबद्दल सादिक खाटीक यांचा यापूर्वी सन्मान केला गेला आहे .
                राज्यातल्या १६ मान्यवर महोदयांनी सादिक खाटीक यांच्यावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदिर्घ लेख लिहून त्यांचे खास अभिष्टचिंतन केले होते. अनेक विद्यमान आमदार , माजी आमदार, माजी मंत्री, माजी खासदार, जि. प.चे माजी अध्यक्ष, शास्त्रज्ञ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, प्रख्यात साहित्यिक माडगुळकर बंधुंचे नातू सुमित्र श्रीधर माडगुळकर पुणे, यांसारखे प्रतिष्ठीत मान्यवर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली - मिरज - कुपवाड , या तीन महानगरपालीकांचे सहा माजी महापौर महोदय, विविध दैनिकांचे संपादक, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, लोकनियुक्त महिला सरपंच व अन्य महिला पदाधिकारी वगैरेंनी सादिक खाटीक यांची राज्य, जिल्हास्तरीय सत्ता पदावर निवड व्हावी म्हणून राष्ट्रीय नेते खासदार श्री . शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्याचे नेते आमदार श्री . जयंतराव पाटील साहेबांकडे लेखी मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य मुस्लीम खाटीक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले सादिक खाटीक आज अखेर समाजाचे राज्याचे प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत. 
               मुस्लीम खाटीक यांच्यासह अन्य मुस्लीम मागासांना १९३६ ते १९५० पर्यंत मिळणारी आणि १९५० नंतर बंद झालेली अनुसुचित जाती आरक्षणाची सवलत मुस्लीम खाटीक बांधवांसह मुस्लीम मागासांना पुन्हा मिळावी म्हणून सादिक खाटीक यांनी २००१ पासून देशव्यापी आवाज उठविला आहे . नवबौद्ध बांधवांप्रमाणे धर्मांतरीत मुस्लीम खाटीक वगैरे मुस्लीम मागासांना नवनुस्लीम म्हणून अनुसूचित जातीची सवलत मिळावी म्हणून सादिक खाटीक यांनी राज्यात सर्वप्रथम आवाज उठविला आहे .
                राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे सादिक खाटीक यांनी , शासन नियुक्त ग. दि. माडगुळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड आणि शेतकरी साहित्य इर्जिक (परिषद) चे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम केले आहे . व्यंकटेशतात्या माडगुळकर कथाकथन महोत्सव स्पर्धा समितीचे अध्यक्ष, मौलाना आझाद विचार मंच महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष, पत्रकार संघटने पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे . 
                आ . जयंतराव पाटील यांच्या, आदेशानुसार गेली २४ महिने *" एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, "* 
हा, *" गाव - प्रभाग बैठकीचा उपक्रम "* आटपाडी येथे सातत्याने राबविण्यात यशस्वी ते ठरले आहेत . विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सादिक खाटीक हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय उपक्रम, सभा, समारंभ, बैठक, आंदोलन, परिषदेत हिरीरीने सहभागी होत आले आहेत . 
                दुष्काळी तालुक्यांमध्ये कृष्णेचे पाणी यावे म्हणून गेली ३० वर्षे सुरू असलेल्या पाणी चळवळीच्या पायाचा दगड बनण्याचे भाग्य सादिक खाटीक यांना लाभले आहे . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर यांना डिसेंबर १९९२ मध्ये आटपाडीत सर्वप्रथम आणण्याचे काम करणारांमध्ये सादिक खाटीक अग्रभागी होते. चळवळीच्या अनेक परिषदेतील त्यांच्या भाषणांना उपस्थितांनी शिट्या, टाळ्या वाजवून टोप्या, फेटे उडवून वेळोवेळी प्रचंड दाद दिली होती. अक्षरशः मैदान डोक्यावर घेतले होते . याचे आजही हजारो साक्षीदार आहेत .
                एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेलच्या वर्धापनदिनानिमित्त संपादक राजीव खांडेकर यांची लाईव्ह मुलाखत घेत असताना, मुलाखत घेणारे दैनिक सामना मुंबईचे संपादक, राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका प्रसंगी *"तुमचे आटपाडीचे मित्र सादिक खाटीक, त्यांच्या विषयी तुम्ही अनेक वेळा मला फोनवरून बोललात."* असे भाष्य करून अप्रत्यक्षरित्या सादिक खाटीक यांच्या कार्याचा गौरव केला होता.
                माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आचार्य शांतारामबापू गरुड, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर, साथी निळू फुले, माजी उपमुख्यमंत्री आर . आर . आबा पाटील साहेब , माजी मंत्री डॉ . पतंगराव कदम साहेब, माजी मंत्री गणपतरावआबा देशमुख, राष्ट्रीय नेते प्रा . अरुण कांबळे, शांताबाई कांबळे, थोर साहित्यीक शंकरराव खरात, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ट पत्रकार मुकुंदराव किर्लोस्कर, संपादक किरण ठाकूर, अशोकराव धोंड, राजेंद्र मांडवकर, शिवराज काटकर, मंगेश मंत्री, संजीव शाळगांवकर, शेखर जोशी, तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे, माजी मंत्री दयानंद मस्के, माजी आमदार ॲड . जयंत सोहनी, माजी आमदार हाफीजभाई धत्तुरे, माजी आमदार प्रा . शरद पाटील सर, माजी न्यायाधीश एहतेशाम देशमुख, न्यायाधीश जीवन आनंदगावकर, वरीष्ट अधिकारी रविंद्र खेबुडकर, नयना गुंडे, वर्षा उंटवाल, कविता द्विवेदी, रामचंद्र शिंदे, प्रदिप कडुस्कर, बाबुराव सुर्यवंशी, के . टी . विधाते, पैलवान नामदेव बडरे, पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता सचिन खिलारी इत्यादी अनेक मान्यवर महोदयांना सादिक खाटीक यांनी यापूर्वी वेगवेगळ्या कार्यक्रमातून गौरविले आहे .
                अल्पसंख्याक समाज बांधव, इतर मागास प्रवर्गातील समाज घटक , अनुसूचित जाती - जमातीचे समाज घटक, अलुतेदारी - बलुतेदारी प्रवाहातले समाज घटकांसह कष्टकरी, शेतकरी, बहुजन समाज बांधव, वंचित, उपेक्षित, मागास, दिव्यांग बांधव, माता, भगिनी, विद्यार्थी, तरुण वर्गासह विविध क्षेत्रामध्ये सतत कार्यरत राहिलेल्या सादिक खाटीक यांच्यावर या नव्या जबाबदारीने त्यांच्या चौफेर कार्यास आणखी उजाळा मिळणार आहे . सादिक खाटीक यांच्या नियुक्तीने कुरेश कॉन्फरन्स आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासह इंडिया आघाडीला राज्य - देशभरातून मोठी ताकद मिळणार आहे .