खून , खुनी हल्ला, खंडणी मारामारी सह अनेक गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुंड सागर चंद्रकांत शेंडगे (वय वर्ष 33 रा. साई मंदिर जवळ अभय नगर ,सांगली) याने सावर्डे (ता. हातकलंगडे) हद्दीतील डोंगरात निर्जन स्थळे विष पिऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
मृत सागर हा सांगलीतील कुप्रसिद्ध गुंड म्हमद्या उर्फ महंमद नदाफ याचा साथीदार म्हणून परिचित होता. सांगलीतील संजय नगर येथे नुकतेच उद्योजकाकडून बारा लाखाची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात सागरचे नाव निष्पन्न झालेले होते .त्या प्रकरणी त्याचा शोध सुरू असताना त्यांना आत्महत्या केल्याचे उघड झालेले आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हातकलंगडे तालुक्यातील सावळले नरंडे रस्त्यावर पुलाजवळ डोंगराकडे जाणारा रस्ता आहे गुरुवारी या रस्त्याने काही मेंढपाळ मेंढ्या चढण्यासाठी गेले होते सायंकाळी झुडपातून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी पाहणी केली. तेव्हा त्यांना साधारण 35 वयाचा तरुणाचा सडलेला मृतदेह दिसून आला त्यांनी पेटवडगाव पोलिसांना याबाबतची माहिती सांगितली पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेहा जवळ शेतात पिकांवर फवारणीचे औषध मिळाले तसेच दुचाकी (एम एच 10 ईसी 3440) ही देखील तेथे आढळून आली त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला शुक्रवारी नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली त्यावेळी मृताचे नाव सागर शेंडगे असल्याचे स्पष्ट झाले जवळपास पंधरा दिवसापासून तो बेपत्ता असल्याचे समजत आहे