सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली येथे एनडीआरएफ यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन, पूर परिस्थिती नियंत्रण प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशिक्षन आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राजा दयानिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, अतिआयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली. एनडीआरएफ पथकाचे स्वागत जिल्हाधिकारी राजा दयानिधी, मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले. या वेळी एनडीआरएफ पथकाचे महेंद्रसिंह पुनिया यांनी आपत्ती उपाय योजनायाबाबत प्राथमिक माहिती देऊन आपत्ती निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना करण्यात येतात याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली. पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्तीबाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी करावे उपाय आहेत याबाबत माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात आपत्ती व्यवस्थापनमध्ये वैद्यकिय मदत अत्यंत महत्त्वाचे असते. त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये CPR बाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी उपस्थित प्रशिक्षनार्थीनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन CPR बाबत अधिक माहिती घेतली.