आयुक्तांच्या या कृतीने सर्वांचे मन जिंकले

Admin
By -



सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत नव्यानेच रुजू झालेले आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी आपल्या कार्याची चुणूक अनेक कामांच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली 
आयुक्तांच्या या कार्यपद्धतीवर महापालिका क्षेत्रातील नागरिक खूपच खुश आहेत. नागरिक आयुक्तांच्या कामावर खुश असल्याचे जाणवत आहे.

आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली शहरातील उद्यानांना काल सकाळी अचानक भेट देऊन सर्व सांगलीकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सांगलीतील आमराई उद्यान, त्रिकोणी बाग व महावीर उद्यान येथे भेट देऊन याठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांशी त्यांनी सुसंवाद साधला. उद्यानात फिरायला येणाऱ्या व योगा करणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. उद्यानातील अडचणी तात्काळ दूर केल्या जातील, यासंबंधी आदेश देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 
उद्यानाची साफसफाई व सुरक्षितता, लहान मुलांची खेळणी तसेच व्यायामाची यंत्रसामुग्री याची दुरुस्ती व देखभाल, यासाठी शासकीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही तसेच लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पावसाळ्यात चालण्याचा ट्रॅक चिखलयुक्त व नादुरुस्त होतो, योगा करण्यासाठी शेड नसलेल्या ठिकाणी शेड उभारण्यात याव्यात. दरवर्षी नवीन झाडे लावण्यात येऊन त्याची निगा राखण्यात यावी, जुनी झाडे व गवती लॉन यांची देखभाल दुरुस्ती व निगा राखण्यात यावी, आमराई मध्ये ड्रेनेज तसेच पाण्याच्या पाईप फुटलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात येऊन सर्व आमराई मध्ये पाण्याचे व्यवस्थापन व्हावे ठिबक सिंचन केल्याने पाण्याची बचत होईल. अशा विविध विषयावर त्यांनी नागरिकांशी चर्चा केली.

हसत खेळत व हलक्या फुलक्या चर्चेतून तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी सांगलीकर नागरिकांची मने जिंकली. स्वतःहून नागरिकांच्यात मिसळणारे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारे त्वरित निर्णय घेणारे असे आयुक्त प्रथमच सांगलीला लाभले आहेत, अशा शब्दात अनेक नागरिकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले व धन्यवाद दिले.

आयुक्तांच्या दिलेल्या या आश्चर्याच्या धक्क्यामुळे सांगलीकर समाधान व्यक्त करत आहे पण आयुक्त आणि असे आश्चर्याचे के वारंवार द्यावे अशी अपेक्षाही सांगलीकर यांच्याकडून होत आहे