नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यामधून तीन पाटील उमेदवार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजीत कदम यांनी पुणा येथे केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत, कदमांचे आणि पाटलांचे चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी केलं आहे
विश्वजीत कदम काय म्हणाले ते ऐका