आमची सांगलीत कोंडी करायचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महारा महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू

Admin
By -





निवडणूका आल्या की सांगलीतील काही लोकांचा सूर्योदय होतो

संजय राऊत म्हणाले, चंद्रहार पाटील यांनी सांगलीची शान वाढविली. पण काहींनी शेतकऱ्यांची कर्जे बुडवून सांगलीची शान वाढवली. निवडणूका आल्या की सांगलीतील काही लोकांचा सूर्योदय होतोय.

चंद्रहार निवडून येणार नाही, असा प्रचार भाजप आणि संघाचे लोक करत आहेत असं राऊत यांनी नमूद केलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांची नक्कल करत टीका देखील केली. आमची सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची कोंडी करू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिलाय.