भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज पक्षाकडून अधिकृतरीत्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी लागणारा एबी फॉर्म स्विकारला.
भाजपाचे क्लस्टर प्रमुख आमदार प्रशांत परिचारकपरिचारक, आमदार सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते एबी फॉर्म संजयकाका पाटील यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, म्हाडा जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर, महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोपे- पाटील, महेश क्षिरसागर उपस्थित होते.