शाहीर पठ्ठे बाबुराव यांच्या जयंतीनिमित्त ढोलकीच्या तमाशातील,गौळणी, लावण्या यांचा कार्यक्रम साजरा
महाराष्ट्र शासन प्रस्तुत सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर, निवेदक कृष्णात पाटोळे, संयोजक भूपाळी ते भैरवी आणि शाहीर देवानंद माळी परिवार तसेच सादर करते लता लंका जयसिंग पाचेगावकर तमाशा मंडळ तसेच सहभागी कलावंत गणा कासेगावकर,बजरंग माडगूळकर, रामहरी घाट,मुबारक बोरगावकर इत्यादी होते.
सौ.जान्हवी जानकर अधीक्षक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागीय कार्यालय पुणे यांनी हा शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागीय अंतर्गत असणाऱ्या कार्यसंचालनालय कडून लोकपावत चाललेल्या लोककलांच करण्याचे काम केले जाते. त्याचाच भाग म्हणून रविवार दिनांक 24 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव जयंती निमित्त गण, गौळणी, लावण्या महोत्सव आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्य संचालनालय महोत्सव दशावतार आयोग कलांचं जतन करण्याचं काम करतँ. तसेच सांस्कृतिक कार्य संचालनाकडून कलाकार मानधन योजना ही राबवली जाते. म्हणजेच जे कलावंत आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वयाच्या शेवटी त्यांना हातभार लावावा म्हणून दरमहा पाच हजार रुपये देण्यात येतो
यावेळी उपस्थित शाहीर देवानंद माळी, संपत कदम लोक कलावंत, सुभाष तपासे, संजय पाटील आकाशवाणी अधिकारी, पंढरीनाथ शेवाळे, जानवी जानकर अधीक्षक सांस्कृतिक कार्यलंय पुणे, आदी मान्यवर उपस्थित होते.